ग्रामपंचायत शेलगाव (बू)

ग्रामपंचायत शेलगाव (बू)

ता.अर्धापूर,जि.नांदेड

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Smt. Sunetra Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Img
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी,नांदेड
श्री. राहुल कर्डिले (भा.प्र.से.)
Img
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड
श्रीमती मेघना कावली (भा.प्र.से)
श्री.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पं),जिल्हा परिषद नांदेड
श्री.दत्तात्रय भगवान गिरी
Img
गट विकास अधिकारी, अर्धापूर
श्री उमाकांत दत्तात्रय तोडावाड
श्री पांडुरंग नामदेव गर्जे
विस्तार अधिकारी(पं),पंचायत समिती,अर्धापूर
श्री पांडुरंग नामदेव गर्जे
 श्री हनुमान गंगाधर राजेगोरे
सरपंच – शेलगाव (बू) ग्रामपंचायत श्री. हनुमान गंगाधर राजेगोरे
श्री ज्ञानेश्वर बाबुराव राजेगोरे
उप-सरपंच– शेलगाव (बू) ग्रामपंचायत श्री. ज्ञानेश्वर बाबुराव राजेगोरे
पंकजा नागनाथ जाकापुरे
ग्रामपंचायत अधिकारी – शेलगाव (बू) ग्रामपंचायतश्रीमती. पंकजा नागनाथ जाकापुरे

गावा विषयी

शेलगाव (बू) हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात वसलेले एक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नांदेड शहरापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर असून तालुक्याचे ठिकाण अर्धापूरपासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर आहे. गावाची भौगोलिक रचना, वाहतूक सुविधा आणि शहराजवळील स्थान यामुळे शेलगाव (बू) हे गाव आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सतत प्रगती करत आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, गावाची लोकसंख्या १,६३३ असून ३२० कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत.

गावातील लोकसंख्या मुख्यतः शेती, दुग्धव्यवसाय व अन्य पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहे.

नांदेड शहराच्या जवळ असल्यामुळे गावाला शैक्षणिक, आरोग्य व बाजारपेठेच्या सुविधा सहज उपलब्ध होतात. शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय असून ग्रामीण जीवनशैली, सामाजिक सलोखा व परंपरांचे जतन ही गावाची ओळख आहे.
गावात भव्य ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारे सर्व नागरिकांना वेळेवर संगणकीकृत दाखले व ऑनलाईन सेवा दिल्या जातात.

गावात आत्माराम महाराज मंदिर विशेष धार्मिक स्थळ आहे. गावात  हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, पिण्याचे पाणी, बाकडे व शेडची व्यवस्था करण्यात आली असून ते ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे.

गावातील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, डिजिटल शिक्षण प्रणाली, प्रोजेक्टर व सुंदर बेंचेस यांच्या साहाय्याने विद्यार्थी १००% उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

शेलगाव (बू) हे गाव भौगोलिकदृष्ट्या अनुकूल स्थानावर वसलेले असून ग्रामपंचायत, लोकसहभाग आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भविष्यात शेलगाव (बू) हे एक आदर्श व प्रगत ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास आहे.

QR कोड स्कॅन करा व कर भरा

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR कोड स्कॅन करा. जलद, सुरक्षित व सोपी ऑनलाइन सेवा.

लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
प्रकल्प चालू
0

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने केलेली कामे...

सरपंच श्री. हनुमान गंगाधर राजेगोरे ...

सन 2024 पासून ग्रामपंचायतीच्या कार्यभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामसेवक, सदस्य आणि विविध विभागांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

ग्रामपंचायतीने “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना”जनसुविधा योजना यांच्या अभिसरणातून अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी गायींचे गोठे उभारणी, निराधार, अपंग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन योजना, तसेच महिला बचत गट प्रशिक्षण, रोजगार निर्मिती उपक्रम, बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी, सौर ऊर्जेवर चालणारी ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शेतरस्ते विकास, बालविवाह बंदी, प्लास्टिक बंदी यांसारख्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, आणि सतत प्रगती यांचा आदर्श उभा केला आहे.

आमचे उद्दिष्ट केवळ भौतिक विकास नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे सामाजिक विकास साधणे हे आहे. गाव आदर्श आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्याच्या दिशेने निश्चितपणे पुढे जात आहे.

“गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे.”

— श्री. हनुमान गंगाधर राजेगोरेे
सरपंच,शेलगाव (बू)

loader-image
हवामान अंदाज
Shelgaon, IN
4:01 pm, Mar 12, 2026
temperature icon 39°C
clear sky
7 %
1006 mb
6 mph
Wind Gust: 7 mph
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 6:35 pm

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा
तारीख नोटिस शीर्षक तपशील
०४ ऑक्टोबर २०२५
ग्रामसभा सूचना
पुढील ग्रामसभा दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता ग्रामपंचायत भवन येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
३० सप्टेंबर २०२५
पाणीपुरवठा बंद सूचना
ग्रामपंचायत हद्दीत देखभाल कामांमुळे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील.
२५ सप्टेंबर २०२५
ग्रामपंचायत कर भरणा सूचना
२०२५-२६ वर्षाकरिता घरपट्टी व पाणीकर भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. वेळेत भरणा करा.
  • जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू.

  • गावात सौर ऊर्जेवर आधारित रस्ते दिवे बसविण्याचा प्रकल्प मंजूर.

  • स्वच्छ ग्राम – हरित ग्राम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल पेमेंट काउंटर सुरू.

  • नागरिकांसाठी “SmartGaav Citizen Portal App” लवकरच उपलब्ध होणार.

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

प्रमुख कार्यक्रम

लाभार्थी रजिस्टर

सरकारी योजना

गावातील छायाचित्रे , ध्वनिचित्रफित

छायाचित्र दालन

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा

 आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.

Instagram वर आम्हाला फॉलो करा — ताज्या अपडेट्ससाठी.कार्यक्रम आणि घोषणा यांचे अपडेट्स